महावीर पाटील; स्तवनिधी पीजी विद्यामंदिरात साहित्य प्रदर्शन
निपाणी (वार्ता) : प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये अनेक कला गुण दडलेले असतात. ते हेरून शिक्षक आणि पालकांनी त्यांच्या गुणांना वाव दिला पाहिजे. तरच विद्यार्थ्यांच्या जीवनात यश मिळू शकते. अशा प्रदर्शनामुळे
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, असे मत संस्थेचे संचालक महावीर पाटील यांनी व्यक्त केले.
पी.जी. विद्यामंदिर, स्तवनिधी येथे आयोजित इंग्लिश भाषा साहित्य प्रदर्शन प्रसंगी ते बोलत होते.
बाहुबली विद्यापीठ संचलित श्री पार्श्वनाथ गुरुकुल विद्या मंदिर स्तवनिती येथे एक नवीन उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये इंग्रजी भाषा विषयाचे व्याकरण व इतर आशयामध्ये वस्तू व साहित्य प्रदर्शन घेण्यात आले. ५२ विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सहभाग घेतला होता. यामध्ये अनेक मॉडेल्स, त्यातही काही क्रियाशील व्याकरणातील नमुने असा सुंदर, सृजनशील, क्रियाशील, नाविन्यपूर्ण हे प्रदर्शन होते.
पूजा मॅडम यांनी स्वागत केले. ‘कलिका चेतरिके’ याचाच भाग म्हणून विद्यार्थ्यांनी तयार केलेले टोप्या सर्व मान्यवरांनी परिधान केल्या. प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे संचालक महावीर पाटील यांनी केले.
प्रदर्शनामध्ये आकाश गिड्डे व ग्रुप, केदार मोकाशी व ग्रुप, अनुष्का माने व ग्रुप, मोहन भागोजी यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. उर्वरित स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली.
मुख्याध्यापक बी. बी. दादानावर यांनी या प्रदर्शनाचे नियोजन केलेले होते. त्यासाठी बी. एस. स्वामी, डी. एस. कडाकणे, सचिन सर, नाईक सर, नेत्रा मॅडम यांचे सहकार्य लाभले. एम. बी. कोल्हापुरे, आर. ए. तावदारे त्यांनी परीक्षेत म्हणून काम पाहिले. डी. एस. कडाकणे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta