
जीवितास धोका : कागल आगाराचा गलथान कारभार
कोगनोळी : कागल आगारातून सोडण्यात येणाऱ्या एसटी बसेस येत नसल्याने कोगनोळीतील विद्यार्थ्यांना सुमारे दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.
येथील हणबरवाडी, दत्तवाडी व वाडी वस्तीवरील शेकडो विद्यार्थी कागल, कोल्हापूर येथील माध्यमिक उच्च माध्यमिक व विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जातात. गेल्या आठ पंधरा दिवसापासून कागल आगारातून सोडल्या जाणाऱ्या बसेस वेळेत व व्यवस्थित सोडल्या जात नसल्याने येथील शेकडो विद्यार्थ्यांना महामार्गापर्यंत सुमारे दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. येथील मुख्य बस स्थानकावर बसची वाट बघून पायपीट करत जाऊन महामार्गावर बस पकडून शाळा कॉलेजला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप वेळ लागत आहे. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
येथील कोगनोळी फाट्यावर उड्डाणपूल नसल्याने विद्यार्थ्यांना महामार्ग पास करून बस साठी थांबावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. महामार्गावर विद्यार्थी थांबून बस पकडण्यासाठी महामार्गावर येत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. महामार्गावरून धावणाऱ्या महाराष्ट्र बसेस येणाऱ्या गावातून विद्यार्थ्यांना घेऊन भरून आल्याने या ठिकाणी उभे असलेल्या विद्यार्थ्यांना बस मध्ये जागा मिळत नाही. तासन तास थांबून विद्यार्थ्यांना शाळा कॉलेज साठी जावे लागत आहे. याची दखल कागल आगार प्रमुखांनी घेऊन विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी येथील विद्यार्थीसह पालकांनी केली आहे.
*एक नजर*
कोगनोळी येथे सकाळी 7 वाजता रंकाळा बस व त्यानंतर सुळकुड बस अश्या दोन बस वेळत सोडण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहे.
———————————————————–
महाराष्ट्र महामंडळाची बस वेळेत न आल्याने तर कधीकधी येतच नसल्याने विद्यार्थ्यांना दररोज महामार्गापर्यंत पायपीट करावी लागत आहे. कागल आगार प्रमुखांनी बस वेळेत व नियमित सोडावी
कु. दिपाली पंढरे, विद्यार्थिनी, (कोगनोळी)
————————————————————-
विद्यार्थी संख्या जास्त आहे. यामुळे एक बस मध्ये चढायची मोठी चढाओढ लागते. यामुळे अनेक विद्यार्थी खालीच रहात आहेत. यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे.
कु. शिवराज पाटील, विद्यार्थी कोगनोळी
Belgaum Varta Belgaum Varta