निपाणी (वार्ता) : लोकांच्या आरोग्यासाठी चंदन किती महत्त्वाचे आहे. चंदनाचे महत्त्व ओळखून निरोगी जीवनासाठी सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान वीरभद्र ऑरगॅनिक अँड सॅंडलवुड अग्रिकल्चर सोसायटीच्या माध्यमातून सुरू केलेल्या चंदन चहाला शिवपुत्र संभाजी महानाट्यमधील छत्रपती शिवाजी राजांची भूमिका साकार करणारे विनायक चौगुले व त्यांच्या सहकलाकारांनी भेट दिली व चंदनापासून तयार केलेल्या चंदन चहाचा आस्वाद घेतला.
यावेळी विनायक चौगुले यांनी माझ्या जन्मापासून मी चंदन कधीच खाल्ले नाही. आज पहिल्यांदाच रियल चंदनाचा चंदन चहा पिल्याने चहाच्या माध्यमातून चंदन माझ्या शरीरात गेले ही एक माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. प्राचीन काळापासून मानवी शरीराला चंदन हा एक अनमोल खजिना आहे पण लोक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सोसायटीच्या माध्यमातून चंदनापासून चंदन चहाची निर्मिती करून चंदन सेवनाची सवय लोकांना लावणे ही एक निस्वार्थी अभिनव संकल्पना राबवत असल्याबद्दल प्रसंशा उद्गार काढले
यावेळी छत्रपतीच्या भूमिकेतील विनायक चौगुले, कुमार नुलकर, नितीन पाचवडेकर, संकेत गडके, अमोल कुंभार, अजिंक्य लोयरे, शंकर लोयरे, आकाश मोरे, रोशन लोयरे, हर्षद लोयरे, राजू कसबे, अथर्व दाभाडे, शोभा शितोळे, संजीवनी शितोळे, सोसायटी पदाधिकारी, नाट्यकलाकार, संगीतकार उपस्थित होते. कृष्णा शितोळे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta