Share

उत्तम पाटील युवा शक्तीतर्फे आयोजन : महिलांची लक्षणीय
बोरगाव (वार्ता) : येथे उत्तम पाटील युवाशक्ती व उत्तम पाटील प्रेमी यांच्यातर्फे हळदी -कुंकू कार्यक्रम होम मिनिस्टर स्पर्धा महिलांच्या जनसमुदायात पार पडल्या. अध्यक्षस्थानी मीनाक्षी रावसाहेब पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, निपाणीच्या माजी नगराध्यक्ष शुभांगी जोशी, विनयश्री अभिनंदन पाटील, धनश्री उत्तम पाटील उपस्थित होते.
प्रारंभी बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील यांच्या हस्ते होम मिनिस्टर स्पर्धेचे उद्घाटन झाले.
या स्पर्धेत बोरगांव होम मिनिस्टर होण्याचा प्रथम मान विद्या वसवाडे यांनी मिळवला. त्यांना फ्रिज व पैठणी बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
पुष्पा कोळेकर यांनी द्वितीय क्रमांकाचे वाशिंग मशीनचे बक्षीस, सुजाता वसवाडे यांनी तृतीय क्रमांकाचे एल ई डी ३२ इंची टीव्ही बक्षीस, पूजा सुडगाडे यांनी चतुर्थ क्रमांकाचे डायनिंग टेबल, पुजा सूडगाडे यांनी,पाचव्या क्रमांकाची तिजोरी मंगल तेरदाळे यांनी, सहाव्या क्रमांकाचे सोफासेट कोमल सातपुते यांननी, सातव्या क्रमांकाचे मायक्रो ओव्हन शिल्पा फिरगण्णावर यांनी, आठव्या क्रमांकाचे शिलाई मशीन मेघा तटमुटे, नवव्या क्रमांकाचे कुलर दीपाली पाटील यांनी मिळविले. दहा ते पंधरा क्रमांकाची नथाची बक्षिसे सुमित्रा पुजारी, शिल्पा बसन्नवर, लक्ष्मी सोबाने, रंजना मळवाडे, सुनीता वास्कर, वैशाली जिनराळे यांनी मिळवली. सोळाव्या क्रमांकाचे मिक्सरचे बक्षिस सोनाली मडिवाळ यांनी पटकावले.
उत्तम पाटील यांनी, आपल्याकडे कोणतीही राजकीय सत्ता नसताना कोरोना, महापूर, अतिवृष्टीसह इतर संकटाच्या वेळी अरिहंत उद्योग समूहातर्फे मदतीचा हात दिला आहे. त्यामुळेच सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला आहे. समाजकारणाला राजकारणाची जोड देण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
त्रिशला भागजे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी राजू पाटील-गावकामगार, निरंजन पाटील-सरकार, गजानन कावडकर, संजय पाटील, अब्दुल पटेल, किशोर इनामदार, सुहास चौगुले यांच्यासह बोरगांव पट्टणपंचायतीचे नगरसेवक अरिहंत उद्योग समूहातील विविध शाखांचे पदाधिकारी, कर्मचारी, उत्तम पाटील युवा शक्ती संघाचे पदाधिकारी, उत्तम पाटील प्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Post Views:
616
Belgaum Varta Belgaum Varta