विद्यार्थ्यांनी प्रथम स्वतःचा शोध घेउन आपल्यामध्ये जे चांगले गुण आहेत त्यांचा विकास करावा. प्रत्येक विद्यार्थ्या मध्ये कोणते ना कोणते कौष्यले असतेच तेव्हा आपल्यामध्ये असलेल्या गुणांचा विकास करुन जीवनामध्ये एक चांगला माणूस बना, असे विचार नवलीहाल येथील सरकारी मद्यामिक विद्यालयाचे मराठी विषयाचे शिक्षक संतोष माने यांनी व्यक्त केले.
मनगुत्ती येथील लाल बहादुर शास्त्री विद्यालयात झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष झुंझरराव पाटील हे होते. प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी के स्वामी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला व उपस्थितांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत केले. तर क्रीडा शिशक एस के मेंदुळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माईंड ट्रेनर विठ्ठल कोतेक र यांनी दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे. उद्घाटन केले तर संतोष माने यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तर सुबराव पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुषपहा घालुन पूजन केले. वर्षभर विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश मिळविलेल्या गुणी विद्यार्थ्यांचे पाहुण्याच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माईंड ट्रेनर विठ्ठल कोतेकर, आर ए कमनगोल यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. तर के एम राऊत यांनी वार्षिक अहवाल सादर केला. झुंझारराव पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले. यावर्षीचा जनरल चॅम्पियन म्हणून प्रीतम कोकित्कर याची तर मुलींमध्ये लक्ष्मी कोतेकर हीची जनरल चॅम्पियन म्हणून निवड करण्यात आली. तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून कुमारी पल्लवी मोरे तर आदर्श विद्यार्थी म्हणून कुमार निखिल कोतेकर याची निवड करण्यात आली आहे. या गुणी विद्यार्थ्यांचे पाहुण्याच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ. देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी एस. एम. कोतेकर, बाळू मगदूम आर बी. शामाने सई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सहायक शिक्षक शिवाजी हसनेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर ए. के. पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta