Monday , September 21 2026
Breaking News

परवानगी न घेता बॅनर-पोस्टर्स लावल्यास गुन्हा दाखल करा : मनोज कुमार मीना

Spread the love

 

बेळगाव : संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे बॅनर व पोस्टर्स लावता येणार नाहीत. त्यामुळे परवानगी न घेता बॅनर व पोस्टर्स लावल्याचे आढळून आल्यास ते चिकटवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशा कडक सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीणा यांनी दिल्या आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांतील निवडणूक अधिकाऱ्यांशी आज मंगळवारी झालेल्या व्हिडिओ संभाषणात ते बोलत होते. आत्तापर्यंत आदर्श आचारसंहिता लागू झालेली नाही; मात्र सध्याच्या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी. महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतींची योग्य ती परवानगी घेतल्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स आणि बॅनर लावता येणार नाहीत. असे अनधिकृत प्रचार साहित्य त्वरित हटविण्यात यावे, असेही ते म्हणाले.

याशिवाय मतदारांना भेटवस्तू, वर्गणी आणि सामूहिक भोजनाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई असावी. असे प्रकार आढळून आल्यास कोणतीही सबब न देता गुन्हा दाखल करता येईल, असेही ते म्हणाले.

भेटवस्तू, साडी, कुकर, घड्याळ इत्यादी कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे चित्र किंवा पक्ष चिन्हासह वाटप, वाहतूक आणि साठा करताना आढळून आल्यास ते देखील जप्त केले जाऊ शकते आणि सध्याच्या नियमानुसार गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
दारूची अनधिकृत विक्री, वाहतूक, साठवणूक किंवा वितरण यावर कडक नजर ठेवली पाहिजे. सीमेवरील चेकपोस्टवर कडक तपासणी करावी अशी सुचना त्यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *