Wednesday , April 22 2026
Breaking News

दुग्धाभिषेक, शहर समितीची पुनर्रचना, उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा

Spread the love

 

बेळगाव : आगामी विधानसभा निवडणूक तसेच राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती दुग्धाभिषेक सोहळ्यासंदर्भात चर्चा करण्यासंदर्भात मराठा मंदिर येथे शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी दीपक दळवी होते.
यावेळी बोलताना दीपक दळवी म्हणाले की, महाराष्ट्र एकीकरण समितीने आजपर्यंत अनेक चढउतार पाहिले आहेत. कितीही संकटे आली तरी आपले ध्येय गाठण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवा. आगामी विधानसभेत समितीचा भगवा फडकला पाहिजे त्यासाठी कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकजुटीने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
समिती नेते रमाकांत कोंडुस्कर म्हणाले की, दुग्धाभिषेक सोहळ्यासाठी आपण यथाशक्ती सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मराठी भाषिकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी समितीचा आमदार होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी बंडखोरी मोडून काढण्यासाठी समितीने कठोर पावले उचलावीत अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.
समितीला बळकटी मिळवून देण्यासाठी विविध भागातील कार्यकर्त्यांना समितीत सामावून घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विधानसभेत भगवा फडकविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी मालोजी अष्टेकर, रणजीत चव्हाण-पाटील, बी. ओ. येतोजी, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, दत्ता जाधव, मदन बामणे, महादेव पाटील, शिवराज पाटील, शिवानी पाटील, अहमद रेश्मी, मोतेश बारदेसकर, सागर पाटील, रणजित हावळानाचे, अनिल आमरोळे, श्रीकांत मांडेकर आदी कार्यकर्त्यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या.
या बैठकीत बाबू कोले, गणेश दड्डीकर, महेश जुवेकर, माजी नगरसेवक राजू बिर्जे, अ‍ॅड. रतन मासेकर, राकेश पलंगे, सुधा भातकांडे, दत्ता उघाडे, साधना पाटील, विकास कलघटगी, गुणवंत पाटील, श्रीधर खन्नूकर, अ‍ॅड. अमर यळ्ळूरकर, चंद्रकांत कोंडूस्कर, अमित देसाई, किरण हुद्दार, आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *