
निपाणीत रोजगाराभिमुख युवक मेळावा
निपाणी (वार्ता) : देशात सध्या स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली आहे. तरीही लाखो युवक बेरोजगार आहेत. पण 40 वर्षापूर्वी अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून तरुण बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम सुरू आहे. याशिवाय महिलांनाही उद्योग व्यवसाय देऊन त्यांना स्वावलंबी बनवले आहे. यापुढील काळात तरुणांनी राजकीय नेत्यांच्या भूलथापांना बळी न पडता व्यवसायाभिमुख काम करणार्या सोबत राहावे. सध्याच्या युवकांमध्येच बदल घडवण्याची ताकद असून त्यांनी या पुढील काळात संघटित राहून काम करण्याचे आवाहन बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी केले. येथील मध्यवर्ती शिवाजी चौकात उत्तम पाटील युवाशक्ती संघातर्फे आयोजित रोजगाराभिमुख युवक मेळाव्यात ते बोलत होते.
उत्तम पाटील म्हणाले, आतापर्यंत आपण सर्वसामान्य व्यक्ती केंद्रबिंदू मानून राजकारणापेक्षा समाजकारणालाच महत्त्व दिले आहे. अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून सूतगिरणी, साखर कारखाने, बँका, कृषी पत्ती संस्था अशा विविध उद्योग व्यवसायातून तरुण, महिला आणि बेरोजगारांना बळ दिले आहे. याउलट काही राजकारणी केवळ निवडणुकीपुरताच युवकांचा वापर करीत आहेत. आता युवकांनीच त्यांना खड्यासारखे बाजूला उचलून ठेवण्याची गरज आहे. शिवजयंती सह विविध धार्मिक कार्यक्रमातही आता राजकारण केले जात आहे. त्यामुळे तरुणांनी अशा संधी साधू लोकांन पासून दूर राहून संस्कृती परंपरा टिकवून ठेवण्याचे काम करावे.
युवा उद्योजक अभयसिंह पाटील यांनी, उद्योग व्यवसाय आणि रोजगार बाबत मार्गदर्शन करून उत्तम पाटील युवा शक्ती संघातर्फे येणार्या सर्वच बेरोजगारांना मोफत रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
प्रारंभी प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार झाला. अवधूत देशपांडे, मोहन घस्ते, आशिष भाट, दिलीप पठाडे, सुनील कांबळे, सचिन पोवार, राजू दाभोळे, सचिन फुटाणकर, नगरसेवक शेरू बडेघर, माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
मेळाव्यास नगरसेवक संजय सांगावकर, शौकत मनेर, संजय पावले, दीपक सावंत, मैनुद्दीन मुल्ला, भूषण मोहिते, अनिस मुल्ला, नितीन साळुंखे, सोमनाथ शिंदे, राजू पाटील- अकोळ, इम्रान मकानदार, शिरीष कमते, विकास चव्हाण, अनिल भोसले, सुनील शेलार, रवी गुळगुळे, प्रसाद बुरुड, अजय माने, श्रेणिक शहा अमोल चंद्रकुडे, सचिन हेगडे, जय सूर्यवंशी, रमेश गोसावी, सुरज राठोड, पांडुरंग चव्हाण, आकाश खवरे, मज्जिद सय्यद, सुनील जाधव यांच्यासह उत्तम पाटील युवाशक्ती संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते व युवक उपस्थित होते. ओंकार शिंदे यांनी सूत्रसंचालन तर प्रमोद जाधव यांनी आभार मानले.
—————————————————————-
स्वाभिमानाला डिवचल्यास मतदार उत्तर देतील
निपाणी भागातील नागरिक जागृत, सुज्ञ आणि स्वाभिमानी आहेत. मात्र सध्याच्या राजकारणातील किळसवाण्या प्रकारामुळे त्यांच्या स्वाभिमानाला डिवचण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आता मतदारच त्यांना उत्तर देतील, असा टोला उत्तम पाटील यांनी कोणाचेही नाव न घेता लागला.
Belgaum Varta Belgaum Varta