Share
१५ वर्षापासून मागणी अपूर्णच : आठवड्याभरात मिळणार हकपत्रे
निपाणी (वार्ता) : तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी नम्म भूमी, नाम्म तोट या योजनेतून मानकापूर आणि कसनाळ येथील ३८ भूमिहीन शेतकऱ्यांना २००८ साली ४६ गुंठे जमीन दिली होती. त्याबाबत बेळगाव येथील कार्यक्रमात हकपत्रही दिले होते. पण आज पर्यंत संबंधित लाभार्थींना ही जमीन दिलेली नाही. त्यामुळे सदरची जमीन तात्काळ संबंधितांना द्यावी. या परिसरात रस्ता ही करून द्यावा, या मागणीसाठी मानकापूर जुन्या ग्रामपंचायत समोर
राजू कुंभार, बबन जामदार यांच्यासह लाभार्थींनी सोमवारी (ता. २०) उपोषण सुरू केले होते. तात्काळ या उपोषणाची दखल घेऊन निपाणीचे तहसीलदार विजय कडगोळ व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या. सोमवारपर्यंत (ता. २७) पर्यंत लाभार्थींना हकपत्र न दिल्यास मलकापूर कृती समिती आणि रयत संघटनेतर्फे चिकोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार, रमेश पाटील व कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी दिला.
माणकापूर आणि कसनाळ येथील भूमिहीन शेतकऱ्यांना सन २००८ साली कर्नाटक सरकारकडून तत्कालीन मुख्यंमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी जाहिर केलेल्या योजनेनुसार ‘नम्म भुमी, नम्म तोट’ या योजनेतून ४६ गुंठे जमीन खसनाळ येथे खरेदी केली. कर्नाटक सरकारकडून दोन्ही गावातील ३८ लाभार्थ्यांना बेळगांव येथील कार्यक्रमात मुख्यंमंत्र्यांच्या हस्ते जागांचे हक्कपत्र देण्यात आले. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने ती हक्कपत्रे शेतकऱ्याकडून काढून घेतली. आजअखेर ती हक्कपत्रे व जमीन ताब्यात देण्यास माणकापूर ग्रामपंचायत टाळाटाळ करीत आहे. त्यासाठी गेली १५ वर्षे माणकापूर व कसनाळ येथील ग्रामस्थ ग्रामपंचायतीला येरजाऱ्या मारत आहेत. काही जेष्ठ नागरिक मयतही झाले आहेत. त्यामुळे ४६ गुंठे जमीन सरकारी सर्व्हे करून व रस्ता उपलब्ध करुन द्यावे. शासनाने मंजुर केलेल्या हक्कपत्राचे ताबडतोब वितरण करावे, या मागणीसाठी माणकापूर व कसनाळ गावातील नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले होते. सोमवारी दुपारी तहसीलदार विजय कडगोळ व अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आठवड्याभरात सर्वच लाभार्थींना जागा, हकपत्र आणि रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे हे उपोषण मागे घेण्यात आले.
या उपोषणामध्ये सागर पुरेकर, दिनकर कुंभार, तानाजी नलवडे, आनंदा कुंभार, पीरगोंडा माळकरी, मलकारी केरोळे, दादा माने, रशीद अपराज बादशहा नदाफ, प्रमोद केरोळे, सुभाष कुंभार, सचिन निकम, अक्षय कुंभार अर्जुन वाजंत्री यांच्यासह लाभार्थी सहभागी झाले होते.
—-
Post Views:
502