Friday , March 6 2026
Breaking News

मांगुर मराठा समाज पदाधिकाऱ्यांचा बोरगावमध्ये सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : मांगुर येथील मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड झाली आहे. समाजाच्या अध्यक्षपदी नांदकुमार राऊत, उपाध्यक्षपदी बाळासाहेब केनवडे, सचिवपदी तानाजी बेलवळे यांच्यासह सदस्यांची सर्वानुमते निवड केली आहे. त्यानिमित्त बोरगाव येथे अरिहंत उद्योग समूहतर्फे त्यांचा बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी युवा नेते उत्तम पाटील यांनी, आतापर्यंत मराठा समाजासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या पुढील काळातही समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. नूतन अध्यक्ष नंदकुमार राऊत यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून या पुढील काळात अरिहंत उद्योग समूहाच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास सुनील डोंगळे, सचिन बरडे पोपट जळणे, यशवंत जाधव, महेश जाधव, विवेकानंद जाधव, सतीश जाधव, विशाल बोधले, स्वप्निल धनवडे, महादेव बारडे, सुनील माने, रवींद्र जळणे, सचिन बोधले, अण्णासाहेब जळणे, पिंटू पाटील, बबन पाटील, बाबुराव आवटे, प्रदीप शेंडगे, रावसाहेब जळणे, प्रमोद पाटील, आकाश खोत, उत्तम कुरुंदवाडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव के. एस. पाटील हायस्कूलमध्ये दहावी विद्याथ्यर्थ्यांचा सदिच्छा समारंभ

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील बोरगाव शिक्षण संघाच्या के. एस. पाटील माध्यमिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *