Wednesday , December 10 2025
Breaking News

ऍड. गणेश गोंधळी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करा : प. पू प्राणलिंग स्वामीजी

Spread the love

 

निपपाणी : विश्व हिंदू परिषद व बजरंग दल आणि निपाणी येथील हिंदुत्ववादी संघटनेकडून तहसिलदर प्रविण कारंडे यांना निवेदन देण्यात आले.

विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाअध्यक्ष प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी यावेळी म्हणाले की, ऍड. गणेश गोंधळी यांच्यावर जो हुबळी येथे अज्ञान समाज‌कंटकानी जो भ्याड हल्ला केला आहे त्याचा आम्ही विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि समविचारी संघटनांच्या वतीने जाहिर निषेध करत आहोत. हल्ला करणाऱ्यांना लवकरात लवकर शोध घेवून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी.

श्री. दत्तपीठ तमनाकावाडा मठाचे मठाधिष प.पू. सदगुरू सच्चिदानंद बाबा यांना यावेळी म्हणाले की, ऍड. गणेश गोंधळी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वकिलीची सनद प्राप्त केली आहे. तसेच त्यांचे सामाजिक व राष्ट्रीय कार्यान मोलाचे योगदान आहे. तसेच आजच्या तरुण युवकांसाठी एक आदर्श व्यक्तीमत्व आहेत. हा हल्ला ऍड. गणेश गोंधळी या व्यक्तीवर नसून तर हा कायदेशीर बंधुत्ववर हाल्ला आहे. तर भविष्यात आशी घटना न घडण्यासाठी प्रशासनानी योग्य ती खबरदारी घ्यावी.

विश्व हिंदू परिषद मातृशक्तीच्या जिल्हा प्रमुख सुचित्राताई कुलकर्णी म्हणाल्या की, अधिवक्ता हा कायदाचां रक्षक आणि न्यायाचा सूत्रधार असतो. जर कायदेशीर शासनाच्या अशा वकिलांच्यावर हल्ला होत असेल तर याचा कायदा, सुव्यवस्था आणि न्याय प्रणालीवर परिणाम होईल. तसेच या घटनेची गांबिर्याने प्रशासनाने दखल घेवून घेऊन भविष्यात ऍड. गणेश गोंधळी आणि त्यांच्या परिवाराला अशा समाज विघातक लोकाच्याकडून त्रास होवू नये. म्हणून प्रशासनाने त्या संरक्षण पुरवावे, अशी मागणी आम्ही करीत आहोत.
यावेळी निपाणीचे तहसिलदार प्रवीण कारंडे यांना निवेदन देते वेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाअध्यक्ष प.पु. प्राणलिंग स्वामिजी, श्री दत्तपीठ तमनकावाड्याचे मठाधिष प.पु. सद्गुरु साचीदानंद बाबा, श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पु. प्रभुलिंग स्वामीजी मातृशक्तीच्या जिल्हा प्रमुख सुचित्राताई कुलकर्णी विश्व हिंदू परिषद निपाणीचे प्रमुख मृणाल कुरबेट्टी, अभिजित सादळकर, रोहन राऊत, उत्तम कमते, अजित सादळकर, संजय हालभावे, चारुदत्त पावले, बजरंग दलाचे निपाणी शहर अध्यक्ष प्रवीण भिसे, युवराज जाधव, योगेश चौगुले, मायाप्पा राहुत, सागर श्रीखंडे, सुर्याजी, मोरबाळे, विनयक चांगभले, समर्थ जबडे, तसेच मोठ्या संख्येने बजरंग दल चे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांनी न्याय, हक्कासाठी अधिवेशनातील मोर्चात सहभागी व्हावे

Spread the love  राजू पोवार यांचे भावनिक आवाहन : ‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांची निपाणीच बैठक निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *