Share
विधानसभा निवडणुक : बंदोबस्त कडक
कोगनोळी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त कडक केला आहे. महाराष्ट्र व इतर राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची या ठिकाणी कसून चौकशी करून व तपासणी करूनच त्यांना कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे.
गेल्या आठ दिवसांमध्ये या ठिकाणी रोख रक्कम व साहित्य जप्त केले आहे. रोख रक्कम व साहित्य जप्त झाल्याने तपास यंत्रणा सतर्क झाली आहे.
पोलीस विभाग, महसूल विभाग, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावतीने तीन शिफ्ट मध्ये या ठिकाणी तपासणीचे काम सुरू आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ येथे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने व वाहनांची तपासणी होत असल्याने टोल नाका परिसरामध्ये वाहनांची गर्दी होत आहे.
या ठिकाणी असणाऱ्या तपासणी नाक्यामध्ये एका शिफ्ट मध्ये सुमारे ४०० ते ५०० वाहनधारकांची तपासणी केली जात असून दिवसभरामध्ये सुमारे २ हजार वाहनांची तपासणी करूनच या ठिकाणी वाहनांना सोडण्यात येत आहे.
सध्या उन्हाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्री थंडी व दिवसभर ऊन यामुळे या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वातावरण बदलाचा त्रास होत आहे. अशातच हे सर्व कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत आहेत.
चिकोडी डीवायएसपी बसवराज एलगार, सीपीआय एस सी पाटील, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कृष्णा नाईक, एस एस चौगुला, विजय पाटील, रमेश भैरनावर, संजय खोत, अनिल माने, जयवंत कराचले, सिध्दू कट्टी या ठिकाणी काम करत आहेत.

Post Views:
839
Belgaum Varta Belgaum Varta