Sunday , July 26 2026
Breaking News

हॉकी बेळगावतर्फे १० एप्रिलपासून हॉकी प्रशिक्षण शिबिर

Spread the love

 

बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव सारख्या ठिकाणी अनेक हॉकीपटूंनी आपल्या अप्रतिम कौशल्याने आणि तल्लख प्रतिभेने ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र अलीकडे हॉकी खेळाची क्रेझ आणि उत्साह कमी झाला असून बेळगावने हॉकीसाठी असलेली ख्याती गमावली आहे. ही खेती पुन्हा मिळविण्यासाठी आणि तरुणांना केवळ हॉकी खेळण्यासाठीच नव्हे तर शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी तसेच विविध स्तरांवर स्वतःचे प्रतिनिधित्व सिद्ध करण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने हॉकी क्लब बेळगावने तरुणांसाठी हॉकी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे.
गुळाप्पा होसमनी (हॉकी क्लब बेळगावचे अध्यक्ष), सुधाकर चाळके (हॉकी क्लब बेळगावचे सचिव) यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होणार आहे. या शिबिरात गोपाळ खांडे (माजी लष्करी अधिकारी), उत्तम शिंदे, (माजी लष्करी अधिकारी), नामदेव सावंत (माजी लष्करी अधिकारी) आणि प्रशांत मंकळे (शारीरिक संचालक) हे तरुणांना प्रशिक्षण देणार आहेत.
हॉकी प्रशिक्षण शिबिर यश इव्हेंटसने प्रासोजित केले आहे. शहरातील सुभाष चंद्र बोस (लेले मैदान) येथे रविवार वगळता १० एप्रिल ते १० मे २०२३ पर्यंत दररोज सकाळी ६.३० ते ८.३० आणि संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत हे प्रशिक्षण शिबिर होणार आहे.

शिबिरासाठी नाव नोंदणी सुरू असून इच्छुकांनी वैदुर्य नाईक : 7026719824, चेतन दोड्डमणी : 8867213306, आणि प्राजक्ता निलजकर : 7022506074 यांच्याशी संपर्क साधावा.

इच्छुक तरुणांनी बहुसंख्येने शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *