Wednesday , December 10 2025
Breaking News

हुतात्मा स्मारकासाठी जागा न मिळाल्यास आंदोलन

Spread the love
प्रा. सुभाष जोशी : तंबाखू आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन
निपाणी (वार्ता) : तंबाखू आंदोलनात १२ शेतकरी हुतात्मा झाले आहेत. त्यांचे बलिदान येणाऱ्या पिढीला समजण्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी स्मारक उभा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला अजूनही मूर्त स्वरूप प्राप्त झालेले नाही. सध्या आचारसंहिता असल्याने पुढील महिन्यात नगरपालिकेत जागेची मागणी करू. यावेळी जागा न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी दिला.
येथील आंदोलन नगरातील हुतात्मा स्मारकाजवळ तंबाखू आंदोलनातील शेतकऱ्यांना गुरुवारी (ता.६) आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी प्रा. जोशी बोलत होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्मारकाची पूजा करून अभिवादन करण्यात आले. प्रा. एन. आय. खोत यांनी प्रस्ताविक केले. आय. एन. बेग यानी, शेतकरी आंदोलनाला ४२ वर्षे पूर्ण होऊनही शेतकऱ्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता जागृत राहून पीक पद्धतीत बदल केला पाहिजे. सरकारचे शेतकरी विरोधात धोरण असून त्याला मूठ माती देण्याचे आवाहन केले.
रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी, शेतकरी आणि चळवळीतील नेत्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सहभागी होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. या पुढील काळात पाडापाडीचे राजकारण बंद करून शेतकऱ्यांचे हितासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यावेळी एस. के. पाटील कॉम्रेड दिलीप वारके, विठ्ठल वाघमोडे, रवींद्र मुतालीक यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रा. डॉ. अच्युत माने, दिलीप पठाडे, निकु पाटील, प्रा. भारत पाटील, धनाजी कांबळे, अशोक तोडकर, अण्णासाहेब कुराडे, बचाराम सांडुगडे, अभय मानवी, आर. बी. पाटील, महेश बाचणे, निरंजन कमते, जयसिंग कांबळे, राजेंद्र नरके, लक्ष्मण लोकरे, शरद कलाजे,माणिक पाटील, नारायण पठाडे, एस.एन. संकपाळ, बाबुराव खोडबळे, बाबुराव मलाबादे, अशोक तोडकर यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
—-
तंबाखू आंदोलनावर पुस्तक
निपाणी येथील तंबाखू आंदोलन ऐतिहासिक असे झाले आहे. त्याची माहिती पुढील पिढीला मिळावी, यासाठी पुस्तक रूपात या आंदोलनाची माहिती तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वांचा सहभाग महत्वाचा असल्याचे प्रा. मधुकर पाटील यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत शस्त्रधारी चोरट्यांकडून धाडसी घरफोडीचा प्रयत्न

Spread the love  चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद : चोरटे धावले पोलिसांच्या अंगावर निपाणी-(वार्ता) : शहरासह उपनगरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *