Wednesday , December 10 2025
Breaking News

वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठे नुकसान

Spread the love
चांद शिरदवाड येथील घटना; नेते मंडळींची भेट
निपाणी (वार्ता) : चांद शिरदवाडसह परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सार्वजनिक मालमत्तेसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये अनेक घरांवरील कौले, पत्रे, प्राथमिक शाळेवरील पत्र्याचे छत उडून गेले आहे. याशिवाय विद्युत खांब कोण म्हणून पडले आहेत. शिवाय अनेकांना बेघर व्हावे लागले आहे. महसूल खात्याने या घटनेचे गांभीर ओळखून तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
शुक्रवारी  दिवसभर चांद शिरदवाडसह परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर रात्री वातावरणात बदल होऊन अचानक विजेचा कडकडाटसह आणि वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अनेकांच्या घरावरील छत व पत्रे उडून गेले आहेत. तर प्राथमिक शाळेवरील पत्र अनेकांच्या घरावर उडून गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेमध्ये नंदकुमार मगदूम, मजिद चाऊस, तमन्ना बडोदे, लैला चाऊस, प्रकाश रोहिदास,चंद्रकांत बडोदे, विठ्ठल कांबळे, सदानंद केंगारे, विनोद कांबळे, बबन पाटील, मधुकर कांबळे, संगीता मिरगे यांच्या घरांचे व प्राथमिक मराठी शाळेचे नुकसान झाले आहे.
चांद शिरदवाडसह परिसरातील काही विद्युत खांब उन्मळून घरावर पडल्याने हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला आहे. या घटनेची दखल घेत बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील, मंत्री शशिकला जोल्ले, माजी आमदार काकासाहेब पाटील आणि नेते मंडळींनी शनिवारी (ता.८) सकाळी चांद शिरदवाड येथील प्राथमिक शाळेसह नुकसान झालेल्या कुटुंबीयांना तातडीने भेट देऊन नुकसानग्रस्तांची पाहणी केली. निपाणीचे तहसीलदार विजय कडगोळ यांनाही घटनेची माहिती देऊन त्यांना तात्काळ मदत मिळून देण्याबाबत सूचना केली. आपणही नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत शस्त्रधारी चोरट्यांकडून धाडसी घरफोडीचा प्रयत्न

Spread the love  चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद : चोरटे धावले पोलिसांच्या अंगावर निपाणी-(वार्ता) : शहरासह उपनगरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *