चिकोडीतून श्रीकांत पाटील; अथणी मधून ॲड. संपतकुमार शेट्टी
निपाणी (वार्ता) : निपाणी विधानसभा मतदारसंघात यंदा प्रथमच आम आदमी पक्षाने उमेदवारी दिली आहे. निपाणी येथे डॉ. राजेश बनवन्ना, चिक्कोडीतून श्रीकांत पाटील तर अथणीमधून ॲड. संपतकुमार शेट्टी यांना सोमवारी (ता.१०) उमेदवारी मिळाली आहे.
गेल्या सहा महिन्यापासून येथील डॉ. राजेश बनवन्ना व त्यांच्या कार्यकर्त्यांनी निपाणी शहर आणि ग्रामीण भागात आम आदमी पक्षाची ध्येय धोरणे पटवून देण्यासह शहरातील विविध समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले होते. डॉ. बनवन्ना यांनी आम आदमी पक्षाच्या वरिष्ठाकडे उमेदवारी मागितली होती. त्यानुसार त्यांना उमेदवारी दिली आहे. चिकोडी येथून हरूगेरी येथील श्रीकांत पाटील हे आम आदमी पक्षाच्या माध्यमातून आपले नशीब आजमावणार आहेत. तर अथणी येथून ॲड. संपतकुमार शेट्टी हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वरील सर्वच ठिकाणी राष्ट्रीय पक्षांना या उमेदवारांचा सामना करावा लागणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta