निपाणी (वार्ता) : येथील श्रीमंत सिद्धोजराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्यामध्ये शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या देव बोलवायचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध देव व जग निपाणकारांचे सौंदत्ती डोंगरावरील रेणुका देवीचा जग, श्री क्षेत्र श्रीशैल आंध्र प्रदेश महादेवाची पालखी, काठी श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर, जोतिबांच्या काठीचे निपाणकर राजवाड्यामध्ये पूजन झाले.
श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते सर्व देवतांचे पूजन व महाआरती झाली. महाप्रसादाचे आयोजन केले होते. सायंकाळी जगाची आरती होऊन सर्व देवतांना परत त्यांच्या ठिकाणी पाठवण्यात आले. रात्री उशिरा ज्योतिबाचा चौक मांडून पूजा झाली. कार्यक्रमाला श्रीमंत विजयराजे निपाणकर, श्रीमंत राजेशराजे निपाणकर, श्रीमंत शरदराजे निपाणकर, श्रीमंत शिवतेजराजे निपाणकर, श्रीमंत युवराज सिद्धोजीराजे निपाणकर, विश्वास पाटील, सुजित गायकवाड, महादेव माने, बाळासाहेब पाटील, संतोष स्वामी, संजय मलबादे, हेमंत सासणे, विजय सासणे, सचिन सासणे, सुनील पाटील, श्रीनिवास चंद्रकुडे, गजानन वसेदार व मानकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta