अवैध वाहतूक रोखण्यासाठी तपास नाक्याची गरज
कोगनोळी : कर्नाटक विधानसभा निवडणूक १० मे रोजी होणार असून २९ मार्चपासून आचारसंहिता लागू केली आहे. अवैध वाहतूक रोखण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर अनेक ठिकाणी तपास नाके उभे केले आहेत. मात्र गजबरवाडी-सुळकूड मार्गावर महाराष्ट्रातून चोरट्या मार्गाने वाहने येत असल्यामुळे या ठिकाणी तपास नाका सुरु करण्याची मागणी होत आहे.
यापूर्वी कोरोना काळ व महाराष्ट्रामध्ये निवडणूक दरम्यान कर्नाटकामधून जाणाऱ्या गजबरवाडी, कून्नूर, शिवापूरवाडी व अन्य गावातून जाणाऱ्या वाहनांची तपासणी महाराष्ट्र पोलीस व निवडणूक अधिकारी सुळकूड ते सांगाव दरम्यान तपास नाका उभा करुन करत होते. अजूनही कोल्हापूरहून कागल, सांगाव, सुळकूड या महाराष्ट्रामधून अनेक वाहने गजबरवाडीमार्गे कर्नाटकात प्रवेश करत आहेत. अनेक तपास नाक्यावर रोख रक्कम, भेटवस्तू, सोने, चांदी, मद्य आदी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
यासाठी गजबरवाडी-सुळकूड मार्गावर अवैध वाहतूक रोखण्यासाठी तपास नाक्याची गरज व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta