Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणीतील दोन नगरसेविकांचा राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांना पाठिंबा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : प्रभागात विकाकामे होत नव्हती म्हणून अपक्ष निवडून येऊन नगरपालिकेतील भाजप प्रणित सत्ताधारी गटाला पाठिंबा दिला होता. परंतु पक्ष नेतृत्वाला अनेक अनेक वेळा सांगूनही वाॅर्डात विकास झालाच नाही. यासह त्यांच्या वागण्याला कंटाळून आम्ही भविष्य असणाऱ्या राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत वाॅर्ड नंबर ३० व ११ च्या नगरसेविका उपासना गारवे, दिपाली गिरी यांनी शुक्रवारी पक्षप्रवेश करून पाठिंबा व्यक्त केला. यावेळी त्यांचे स्वागत उत्तम पाटील यांनी केले.
यावेळी बोलताना नगरसेवक नगरसेविका उपासना गारवे म्हणाल्या, केवळ आपल्या वाॅर्डामध्ये आतापर्यंत १६ लाखाची विकासकामे झाली असून वेळोवेळी विकास कामाबाबत नगरपालिकेत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्यावर दबाव आल्याने कार्यकर्ते व नागरिकांच्या आग्रहास्तव आपण हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
नगरसेवक विलास गाडीवडर म्हणाले, राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांना मतदारसंघातील सर्व स्थरातून पाठिंबा मिळत आहे.त्याला नगरपालिका अपवाद ठरू नये. यासाठी आतापर्यंत १४ पैकी १३ नगरसेवकांनी उत्तम पाटील यांना पाठिंबा देत त्यांना आमदार करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यांचा या निवडणुकीत विजय निश्चित आहे. अद्यापही आमच्याशी ४ नगरसेवक संपर्कात आहेत. लवकर त्यांचाही राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार उत्तम पाटील यांना पाठिंबा मिळणार असून ते प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नगरपालिकेतील संख्याबळ १७ वर जाणार आहे. अर्थात आमच्या बाजूने संख्याबळ १७ झाल्याने साहजिकच नगरपालिकेतील सत्ताधारी गट कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वी अल्पमतात आला आहे. त्यामुळे निश्चितच आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सर्व स्तरातून उत्तम पाटील यांना पाठिंबा वाढल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.
गोपाळ नाईक म्हणाले, काळाची पाऊले ओळखून नगरसेविका दिपाली गिरी व उपासना गारवे यांनी योग्य निर्णय घेतल्याचे सांगितले. उत्तम पाटील म्हणाले, नगरसेविका गारवे व गिरी यांनी निर्णायक भूमिका घेतली घेऊन आपल्याला पाठींबा दिला आहे. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढल्याचे सांगून त्यांचे स्वागत केले.
यावेळी नगरसेवक रवींद्र शिंदे, शांता सावंत, अनिता पठाडे, दिलीप पठाडे, संजय सांगावकर, दत्ता नाईक, शेरू बडेकर, अनिस मुल्ला, संजय सांगावकर, दीपक सावंत, निरंजन पाटील, लक्ष्मण आबणे, शिरीष कमते, इम्रान मकानदार सचिन बिंदगे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांनी न्याय, हक्कासाठी अधिवेशनातील मोर्चात सहभागी व्हावे

Spread the love  राजू पोवार यांचे भावनिक आवाहन : ‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांची निपाणीच बैठक निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *