निपाणी : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून उभे असलेले उत्तम रावसाहेब पाटील यांच्या गटात जत्राट गावचे माजी ग्राम पंचायत अध्यक्ष व नेते रमेश भिवसे व त्यांचे सहकारी यांनी प्रवेश करून येत्या 10 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत उत्तम आण्णा यांना भरघोस मताने निवडून आणण्याचा संकल्प केला.
यावेळी उपस्थितांसमोर बोलत असताना निपाणीचे माजी आमदार सुभाष जोशी सर म्हणाले की, निपाणीच्या सर्वांगीण विकासासाठी एक नवीन तडफदार चेहरा हवा असेल तर तो म्हणजे उत्तम आण्णा पाटील हेच एकमेव पर्याय आहे.
उत्तम पाटील म्हणाले की, अरिहंत समुहाच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य असेल, क्रिडा क्षेत्र असेल, कोरोना काळात केलेले कार्य किंवा पुर परिस्थितीच्या वेळी अरिहंतने परिवाराने केलेले कार्य पाहता जनता नक्कीच माझ्यावर विश्वास ठेवेल यात शंका नाही.
यावेळी शुभांगी जोशी, शिवगोंडा पाटील, निरंजन पाटील, उत्तम आण्णा पाटील गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta