राजू पोवार : बेडकीहाळ, गळतगा परिसरात सभा
निपाणी (वार्ता) : प्रत्येक गावातील शेतकरी संघटित नसल्याने दहा वर्षापासूनच आपण शेतकऱ्यांचे संघटन करून रयत संघटनेच्या नावाखाली कामकाजाला सुरुवात केली. अतिवृष्टी पूर परिस्थितीमध्ये नुकसान झालेल्या पिकाला भरपाई मिळवून दिली आहे. तर पडझड झालेल्या घरांनाही मदत मिळावी, यासाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर संघटनेतर्फे आंदोलन करून न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे आता शेतकरी व सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावावे, विधानसभा निवडणूक लढवीत आहे. शेतकऱ्यासह मतदारांनी आपणाला मतदान करून विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जनता दलाचे उमेदवार राजू पोवार यांनी केले, बेडकीहाळ आणि परिसरात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
राजू पोवार पुढे म्हणाले,रयत संघटनेच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. पण राज्यकर्ते बऱ्याच वेळा आपल्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे धजदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रताप पाटील, प्रसन्नकुमार गुजर, सुनिता होनकांबळे यांच्यासह वरिष्ठांनी आपणाला तिकीट दिले आहे.निवडून आल्यानंतर बळीराजाला चांगले दिवस अणण्यायासह निपाणी मतदारसंघात मूलभूत सुविधा आणि विकास कामे राबविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये रस्ते आरोग्य पाणी वीज शाळा अशा गोष्टींना अधिक महत्त्व देणार आहे. याशिवाय पिकाला हमीभाव, खतांचे दर कमी करणे, शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे बी- बियाणे देणे या सर्व गोष्टींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी चुनाप्पा पुजारी, रमेश पाटील, सर्जेराव हेगडे, महावीर चौगुले, प्रवीण शितोळे, सुभाष चौगुले, बाळासाहेब भोसले, राजू हुळेकुप्पे, राजू उपाध्ये,शिवाजी पांडव, उदय चौगुले यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
—
Belgaum Varta Belgaum Varta