निपाणी (वार्ता) : खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून भारतीय महिला कुस्ती पटूवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप होत आहे. या महिलांना न्याय मिळावा यासाठी दिल्लीतील जंतर मंतर वर धरणे आंदोलन सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी येथील नागरिक आणि आम आदमी पक्षातर्फे तहसीलदारांना शुक्रवारी (ता.१९) निवेदन देण्यात आले. तसेच कुस्तीगीरांच्या निषेधाला पाठिंबा देण्यात आला.
निवेदनातील माहिती अशी, महिला कुस्तीगारांचा खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी सात महिलांचा बेकादेशीरपणे लैंगिक छळ केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. या महिलांना न्याय मिळावा यासाठी
गेल्या आठवड्यापासून दिल्लीमधील जंतरमंतर मैदानावर आंदोलन सुरू आहे. याप्रकरणी प्रकरणी सिंह यांच्या अटकेची मागणी केली आहे. चला आम आदमी पक्षाचा पाठिंबा आहे. आंदोलकांच्या मुद्द्यावर सरकारने त्वरित लक्ष घालून सखोल चौकशी करावी. याप्रकरणी दोषी आढळणा-यावर कारवाई करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. तहसीलदार विजय कडगोळ यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार, नंदकिशोर कांगळे, प्रा. कांचन बिरनाळे -पाटील, लतिफा पठाण, वशिम पठाण, आदर्श गिजवनेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.