
लवटे, हजारे यांचा उपक्रम : समाज बांधवाकडून कौतुक
निपाणी (वार्ता) : रानावनात भटकणाऱ्या धनगर समाज बांधवाकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे हा समाज शिक्षणा मध्ये अजूनही प्रगती केलेला नाही. ही बाब गांभीर्याने घेऊन बेनाडी येथील बिरदेव यात्रेच्या निमित्ताने मुख्याध्यापक दत्ता लवटे आणि विज्ञान शिक्षक एस.एस. हजारे या शिक्षक मित्रांनी गौराबाई लवटे आणि भागीरथी हजारे यांच्या स्मरणार्थ धनगर समाजातील गुणी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वस्तू वस्तू देऊ वाघापूर येथील सिद्धार्थ ढोणे महाराज यांच्या हस्ते नसत्कार करून एक नवा उपक्रम राबवला. त्यांच्या या उपक्रमाचे समाजबांधवातून कौतुक होत आहे.
नुकत्याच झालेल्या प्राथमिक, माध्यमिक मध्ये सर्वोत्कृष्ट गुण मिळवून यश मिळवलेल्या सागर हजारे, विशाल जानकर, प्रज्वल हजारे, ब्रह्मानंद हजारे, होणसिद्ध बोते, मारुती रानगे, संगीता हजारे, साईनाथ हजारे, साक्षी सौंदलगे, कीर्ती हजारे, शोभा हजारे- धनगर, स्फूर्ती लवटे, अंजना भानसे यांचा सत्कार झाला.
मुख्याध्यापक दत्ता लवटे यांनी, धनगर समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासह त्यांना स्फूर्ती मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम यंदा पण सुरू केला आहे. प्राथमिक ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत उत्तम गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा दरवर्षी गौरव करणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन समाजाचे नाव उज्वल करण्याचे आवाहन केले.
ए. एस. हजारे यांनी, धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी ध्येय मनाशी बाळगून जिद्दी चिकाटीने अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते. आपणाला कुटुंबाचा पाठिंबा नसतानाही केवळ अभ्यासामुळेच आपण चांगल्या पदापर्यंत पोहोचलो असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास अविनाश हजारे, शिवाजी ढवणे, अण्णा हजारे, जकाप्पा हजारे, शंकर जानकर, आप्पाजी लवटे, रवींद्र हजारे, कल्लाप्पा भानसे, हजारे, शिवराम बोते, मायाप्पा बन्ने, वासू रानगे, बाबुराव ढवणे, शिवाजी हजारे, लक्ष्मण जानकर, दत्ता ढवणे, तानाजी हजारे, वासू रानगे, शोभा लवटे, गंगुबाई हजारे, निंगव्वा ढवणे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta