Wednesday , December 10 2025
Breaking News

सिमेंटच्या पाईप डोक्यावर पडल्याने युवकाचा मृत्यू

Spread the love

 

सौंदलगा येथील घटना : जगण्याची झुंज ठरली अपयशी
निपाणी (वार्ता) : डोक्यावर सिमेंट पाईप पडल्याने एक जण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना तिसऱ्या दिवशी या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना माळ भाग सौंदलगा येथे घडली. तीन दिवस जगण्यासाठी केलेली झुंज अखेर अपयशी ठरली. उत्तम शिवाजी चव्हाण (वय४२) असे या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे सौंदलगा आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, सौंदलगा येथे घर वजा शेडसाठी उभे केलेली सिमेंट पाईप काढत असताना ती पाईप डोक्यावर पडल्याने उत्तम चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली होती.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सोमवारी (ता.२२) सायंकाळी मयत उत्तम हा आपल्या मित्रांसोबत घराशेजारी असलेल्या शेडसाठी उभा केलेली सिमेंटची पाईप पोकलँड मशीनच्या साह्याने बाजूला घेत होता. यावेळी मशीनच्या साह्याने बाजूला घेत असताना उकडून निघालेली पाईप उत्तम यांच्या डोक्यावर पडली. त्यामुळे उत्तम खाली कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला. दरम्यान त्याला तात्काळ निपाणीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण प्रकृती चिंताजनक बनल्याने कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानुसार त्याच्यावर तीन दिवसापासून उपचारही सुरू होते. दरम्यान बुधवारी (ता.२४) सकाळी कोल्हापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले असता मध्यरात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. उत्तम याचा मृत्यू झाल्याचे कळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मयत उत्तम यांच्यावरील गुरुवारी (ता.२५) सकाळी सौंदलगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा, बहीण असा परिवार आहे.
—————————————————————

कुटुंब झाले पोरके
प्रत्येकाच्या अडीअडचणीच्या काळात हाकेला धावणारा ‘उत्तम’ नावाप्रमाणेच अनेकांना मदत करत होता. हालाखीच्या परिस्थितीची जाणीव ठेवून त्याने कुटुंबाची जबाबदारी घेत रिक्षाचा व्यवसाय सुरू केला. जिद्द कष्टातील सातत्य आणि मनमिळावू स्वभावाच्या जोरावर त्याने रिक्षा विकून ट्रॅक्टर खरेदी केला. थकलेले वडील, आई, पत्नी, मुलांसाठी रात्रीचा दिवस कष्ट करीत असताना त्याच्यावर काळाने घाला घातला.`उत्तम’ च्या अचानक जाण्याने कुटुंबात पोरके झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत शस्त्रधारी चोरट्यांकडून धाडसी घरफोडीचा प्रयत्न

Spread the love  चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद : चोरटे धावले पोलिसांच्या अंगावर निपाणी-(वार्ता) : शहरासह उपनगरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *