
तहसीलदार विजय कडगोळ; निपाणीत महिलासाठी मोफत बस योजनेचा प्रारंभ
निपाणी (वार्ता) : राज्यातील काँग्रेस सरकारने निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी मोफत बस प्रवास योजना महिलांसाठी उपयुक्त ठरेल. त्याचा लाभ महिलावर्गाने घ्यावा अशी आवाहन तहसीलदार विजय कडगोळ यांनी केले. येथील बस स्थानकात रविवारी (ता.११) मान्यवरांच्या उपस्थितीत महिलांसाठी मोफत बस सेवेचा प्रारंभ झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
वाहतूक निरीक्षक आर.ए. शास्त्री म्हणाले, महिलांसाठी मोफत बस प्रवास प्रारंभ झाला आहे. त्यासाठी महिलांनी आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना, रेशनकार्ड यापैकी एक पुरावा प्रवास करताना जवळ असणे अनिवार्य आहे. महिला, विद्यार्थिनी, युवती कर्नाटकाची रहिवासी असली पाहिजे. राज्यभरातील सर्व साध्या आणि एक्सप्रेस बसमधून मोफत प्रवास असणार आहे. बसमधील कंडक्टर प्रवासी महिलांना शून्य रुपयांचे गुलाबी तिकीट देणार देणार आहे. राज्यभरात कुठेही प्रवास करण्याची सवलत असून दिवस-रात्र कितीही वेळा लाभ महिला या योजनेचा घेऊ शकतात. रात्रीही सवलत कायम आहे. तीन महिन्यांत शक्ती स्मार्ट कार्ड मिळवणे आवश्यक असून त्यासाठी सेवा सिंधू वेबसाईटवर महिलांनी अर्ज करावा. ऐरावतसह आराम बस आणि वातानुकूलित बसमध्ये ही सवलत नसल्याचे सांगितले.
आगार प्रमुख संगाप्पा म्हणाले, प्रत्येक बसमधून प्रवास करणारे एकूण प्रवासी आणि महिला प्रवाशांची अचूक माहिती मिळण्यासाठी विशेष शून्य रकमेचे तिकीट तयार करण्यात आले आहे. बसमध्ये पुरुष प्रवाशांप्रमाणे महिला प्रवाशांनाही तिकीट दिले जाईल. त्यामध्ये महिला प्रवाशांनी कोणत्या ठिकाणाहन प्रवास केला, हा तपशील मिळणार आहे. तिकिटासाठी महिला प्रवाशांना कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. मात्र, तिकीट काढणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सुप्रिया पाटील यांनी, काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पुर्ती करत महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू केली आहे. त्यामुळे सिद्धारामय्या सरकार अभिनंदन पात्र आहे. या योजनेचा सर्व महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी खडकलाट पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक सुमलता आसंगी, कर्मचारी पी.जी. सनदी, दीपक ढणाल, यरनाळ ग्रामपंचायत अध्यक्ष संजय पाटील, माजी नगरसेवक किरण कोकरे, अल्लाबक्ष बागवान, धनाजी निर्मळे, नंदकुमार कांबळे, माजी नगरसेविका शैलजा चडचाळे, सुमन खवरे, संगीता निकम नवनाथ चव्हाण, अवधूत गुरव, प्रतीक शहा, बबन घाटगे, किसन दावणे, रवींद्र श्रीखंडे, प्रकाश पोटजाळे, प्रतीक शाह, बाळासाहेब कमते, संदीप खडके, बाळासाहेब पाटील, अवधूत गुरव, काशीमखान पठाण यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते, प्रवासी वर्ग महिला उपस्थित होत्या. महादेव शिरगावे यांनी करून आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta