अण्णासाहेब हवले; बोरगावमध्ये महिलांना मोफत बस सेवेचा प्रारंभ
निपाणी (वार्ता) : राज्यातील काँग्रेस सरकारने निवडणुकीच्या वेळी दिलेल्या जाहीरनाम्यातील वचनांची पूर्ती केली आहे. त्यामुळे महिलांना मोफत बस उपक्रम सुरू झाला आहे. महिलांनी येत्या तीन महिन्यासाठी आधार कार्ड दाखवूनच सर्वत्र प्रवास करायचा आहे. शिवाय पुढील काळात सेवासिंधू कार्यालयातून स्मार्ट कार्ड घेऊन संपूर्ण राज्यात मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले यांनी दिली. बोरगाव येथील बसस्थानकावर काँग्रेस सरकारने राबवलेल्या शक्ती योजनेअंतर्गत महिला मोफत बस प्रवास योजनेचा प्रारंभ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष व माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
हवले म्हणाले, कर्नाटक काँग्रेस सरकारने राज्यात सहा वर्षांवरील मुलीपासून ते वृद्ध महिला पर्यंत सर्वाना राज्यात सर्वत्र मोफत प्रवास करण्यासाठी ही योजना राबवली आहे.
त्यानुसार रविवारी (११) पासून दुपारी या योजनेची अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता. त्यानुसार परिसर या योजनेचे उद्घाटन झाले आहे. या पुढील काळात पाच योजना सह आणखी नवनवीन योजना शासन राबविणार असल्याचे सांगितले.
प्रारंभी उपस्थित महिला व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हस्ते बसचे पूजन करून या योजनेचा बोरगाव स्थानकात प्रारंभ झाला. केला. निपाणी-चिक्कोडी मार्गावर प्रवास करणाऱ्या महिलांना आधार कार्ड दाखवून या बस मधून प्रवासही केला.
यावेळी युवा उद्योजक अनुज हवले, बाळासाहेब बसन्नावर, संजय हवले, अण्णासाहेब बारवाडे, नरसू बंकापुरे, विद्याधर अम्मनवर, शिवाप्पा माळगे, रावसाहेब तेरदाळे, बबन मुजावर, बाबासाहेब पाटील, अजित रोड्ड, आशपाक मुजावर, भाऊसाहेब बंकापुरे, भरत हवले, सिद्धार्थ हवले, यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta