निपाणी (वार्ता) : कुन्नूर (ता. निपाणी) येथे बस स्थानकामध्ये मटका घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सोमवारी (ता.१२) दुपारी साडेबाराच्या सुमारास एकावर कारवाई करण्यात आली.मारुती शामराव वडर( वय ३० रा. कुन्नूर) असे कारवाई केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत निपाणी ग्रामीण पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, कुन्नूर बसस्थानका नजीक एक जण मटका घेत असल्याची माहिती निपाणी ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार निपाणी ग्रामीणचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार, हवालदार संजय काळे, आर. वाय. मेलगडे, एम. एफ. नदाफ, ए. व्ही. चंदनशिवे यांनी कारवाई केली. मटका घेत असलेल्या मारुती वडर याच्याकडून ३४० रुपये व मटक्याच्या चिट्ट्या जप्त करण्यात आल्या. या घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलिस स्थानकात झाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta