निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात सन २०२३ – २४ मधील शैक्षणिक वर्षाचा विद्यार्थी प्रारंभोत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त प्रकाशभाई शाह होते. यावेळी त्यांनी सर्वांना शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
नवागत विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात औक्षण करून आगमन झाले. मान्यवर व प्रकाशभाई शाह यांच्या हस्ते, गणवेश, रोपटे व पाठयपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. रंगोली फॅशन यांच्या मार्फत सूरज शहा यांनी होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले. मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले यांनी प्रास्ताविकातून शाळेचा विविध क्षेत्रातील यशाचा वारसा व नावलौकिक सांगितला.
यावेळी ज्येष्ठ शिक्षिका एस. बी. पाटील, शिक्षक प्रतिनिधी आर. आर खपले, कर्मचारी प्रतिनिधी बी. एल. तिप्पे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले. एस. एस सांडगे यांनी स्वागत केले. आर. डी. देसाई यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta