निपाणी (वार्ता) : रिक्षा व्यवसायिकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संघर्ष करत आहेत. परंतु छोट्या-छोट्या मागण्यांकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांचे जगणे कठीण झाले आहे, त्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन मागण्यांचे पूर्तता करावी या मागणीचे निवेदन तहसीलदारामार्फत निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक -मालक संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना तहसीलदार कार्यालयामधील शिरस्तेदार के. वाय. निढोनी यांना दिले.
निवेदनातील माहिती अशी, राज्यात १० लाखांहून अधिक रिक्षाचालक आहेत. दररोज गर्भवती महिला, वृद्ध, अपंग, लहान मुले आणि आजारी व्यक्तींची विश्वास आणि प्रामाणिकपणाने सेवा करत आहोत. नवीन रिक्षांच्या किमती अवाजवी असल्याने त्यांचे सुटे भाग, तेल, पेट्रोल, गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. पण रिक्षा भाडे तेच आहे.
राज्य सरकारने महिलांसाठी बस प्रवास मोफत केला आहे. त्यामुळे रिक्षातील प्रवाशांची संख्या खूपच कमी झाली आहे.
दैनंदिन कामातून उत्पन्न कमी असल्याने बँकेचे कर्ज, जादा विमा भरणे, घरगुती वस्तू खरेदी करणे, मुलांच्या शिक्षणाची काळजी घेणे, कुटुंबातील सदस्यांना हातभार लावणे या जबाबदा-या पूर्ण करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांना त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या आधारे राष्ट्रीय स्वास्थ विमा योजनेंतर्गत दरवर्षी १९ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार देण्यात यावेत. रिक्षाचालकांच्या मुलांना शिक्षण मोफत द्यावे. अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्यास १० लाखांपर्यंत आणि अपंग आल्यास ५ लाखांपर्यंत नुकसान भरपाई मिळावी, यासह विविध मागण्या करण्यात आले आहेत. यावेळी कर्नाटक राज्य रिक्षा बस, ट्रान्सपोर्ट फेडरेशन अध्यक्ष गजानन खापे, बेळगाव जिल्हा फेडरेशन अध्यक्ष प्रवीण झळके, संचालक दिलीप साळुंखे, शिवराज हुक्केरी, शाम टिकारे, चंदू पाटील, मेजर काशिनाथ कंग्राळकर, नागेश मंगसुळे यांच्यासह पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta