दोन उपकरणांची राज्य प्रदर्शनासाठी निवड
निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इन्स्पायर अवॉर्ड जिल्हा विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय यश प्राप्त केले. २०२१-२२ मध्ये कुर्ली हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांना इन्स्पायर शिष्यवृत्ती मिळाली होती. ऑनलाईन पध्दतीने घेतलेल्या या प्रदर्शनात दोन उपकरणांची राज्य प्रदर्शनासाठी निवड झाली असल्याचे डाएट प्राचार्य मोहन जिरगीहाळ यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
विज्ञान शिक्षक एस. एस. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली मंजिरी दादासाहेब कांबळे या विद्यार्थीनीने महिलांना उपयुक्त महिला सुरक्षा हे बहुउपयोगी उपकरण बनविले आहे. अवधूत केरबा पाटील यांने शेतकऱ्यांना उपयुक्त बहुउद्देशीय शेती उपकरण बनविले आहे. दोन्ही उपकरणांची उपयुक्ततेच्या आधारे राज्य प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनमध्ये २०१०-११ पासून कुर्ली हायस्कूलच्या १८ विद्यार्थ्यांना इन्स्पायर अवॉर्ड राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. आता पर्यंत त्यापैकी ९ उपकरणे राज्य प्रदर्शनासाठी व ४ उपकरणे राष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी झाली असल्याचे इन्स्पायर जिल्हा नोडल अधिकारी यु. ए. मुल्ला यांनी सांगितले.
चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा उपनिर्देशक मोहनकुमार हंचाटे, निपाणी गट शिक्षणाधिकारी रेवती मठद, मुख्याध्यापक बी. एस. पाटील, बीआरसी आर. ए. कागे, शिक्षण संयोजक महालिंगेश, बीआरपी प्रवीण कागे यांनी सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या निवडीबद्दल परिसरातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta