निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त गुरुवारी (ता.२९) दिंडी व पालखी सोहळा झाला. मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले यांनी पालखीचे पूजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत डोईवर तुळस व कलश घेऊन लेझीमच्या ठेक्यावर वीणा, टाळ व मृदंगासोबत विठूनामाचा गजर करत दिंडीने बसवाननगर मधून मार्गक्रमण केले. एस. बी. पाटील यांनी दिंडीत सहभागी विदयार्थी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
यावेळी आर. आर. कपले, कर्मचारी प्रतिनिधी बी. एल. तिप्पे, आर. एस. भोसले, आर. डी. देसाई, एस. व्ही. पाटील, व्ही. व्ही. पाटील, एस. के. बुच्चे, एन. जे. खेबुडे उपस्थित होते.
कार्यक्रमाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांच्यासह संचालकांचे प्रोत्साहन लाभले.