निपाणीतील घटनेमुळे महिलांमध्ये भीती
निपाणी (वार्ता) : शाळा सुटल्यानंतर घरी जाqणाऱ्या शिक्षिकेचे दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी दीड तोळ्याचे गंठण हिसकावून पोबारा केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास निपाणी येथे घडली. मीनाक्षी चंद्रशेखर सनदी (रा. लेटेस्ट कॉलनी, निपाणी) असे या महिलेचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळासह पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मीनाक्षी सौदी या गेल्या वीस वर्षापासून येथील विद्यासावर्धक शिक्षण मंडळामध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे त्या गुरुवारी (ता.१३) शाळा सुटल्यानंतर शिवाजीनगर मार्गे लेटेक्स कॉलनीकडे निघाल्या होत्या. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास प्रकाश चव्हाण यांच्या घरासमोरून जात असताना स्प्लेंडर दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यात हात घालून दीड तोळ्यांचा गंठण हिसडा मारून पोबारा केला. त्यामुळे सवदी यांनी आरडाओरडा करताच काही नागरिकांनी चोरट्यांच्या दुचाकीवर दगडफेक केली. त्यामुळे एका छोट्या च्या डोकीला मार लागला. तरीही चोरट्यांनी न थांबता भारगाव वेगाने दुचाकी घेऊन पलायन केले.
सवदी कुटुंबीयांनी तात्काळ निपाणी शहर पोलीस ठाण्याला संपर्क साधून याबाबत फिर्याद दाखल केली आहे. उपनिरीक्षक उमादेवी व सहकाऱ्यांनी चोरट्यांचा शोध सुरू ठेवला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta