Monday , June 8 2026
Breaking News

बोरगाव औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांना सबसिडी द्या

Spread the love

 

माजी आमदार काकासाहेब पाटील; वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील यांच्याशी चर्चा

निपाणी (वार्ता) : कर्नाटकात घरगुती आणि व्यवसायिक वीज बिलात वाढ झाली आहे. त्याचा उद्योजकांना आर्थिक फटका बसत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन तात्काळ वस्त्रोउद्योग व्यवसायिकांना सबसिडी सुरू करून त्यांना दिलासा द्यावा. याबाबत वस्त्रोद्योग आयुक्तांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे सीमा भागातील वस्त्रोद्योग टिकणार असून व्यवसायिकांनी न घाबरता आपले व्यवसाय सुरू ठेवावेत अशा आवाहन वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील यांनी केले.
कर्नाटक -महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या बोरगाव येथील अनेक व्यावसायिकांनी वस्त्रोद्योग उभारून दोन्ही राज्यातील मजुरांना काम दिले आहे. पण गेल्या काही दिवसापूर्वी या व्यवसायिकांचे वीज बिल मोठ्या प्रमाणात आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक व्यवसायिकांनी आपले व्यवसाय बंद केले आहेत. शिवाय अनेकांचा उदरनिर्वाह चालणे कठीण झाले आहे. त्यामुळे बोरगाव मधील वस्त्रोद्योग व्यवसायिकांनी माजी आमदार काकासाहेब पाटील, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर यांच्या नेतृत्वाखाली वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील व वस्त्र उद्योग आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते.
यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी, बोरगाव आणि परिसरातील वस्त्रोद्योग आणि इतर औद्योगिक वसाहती बाबत माहिती दिली. वाढीव वीज बिलामुळे अनेकांचे उद्योग, व्यवसाय धोक्यात आले आहेत. त्यामुळे शासनाने वीज बिलामध्ये सबसिडी देण्याची मागणी काकासाहेब पाटील यांनी मंत्री शिवानंद पाटील यांच्याकडे केली.
चिकोडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर यांनीही याबाबत मंत्री पाटील यांना माहिती दिली. त्यानुसार वीज विलास सबसिडी देण्यासह वस्त्रोद्योग आणि इतर औद्योगिक वसाहती मधील प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी वस्त्रोद्योग खात्याच्या आयुक्तांना दिल्या. याशिवाय उद्योग व्यवसायासाठी असलेल्या उपलब्ध १२ कोटी रुपयांच्या निधीचाही उपयोग करण्याच्या सूचना दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षक संघटनेतर्फे मंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन

Spread the love  निपाणी (वार्ता) : अनुदानित शाळा-महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या निकालात काढण्याच्या मागणीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *