निपाणी (वार्ता) : कागल येथील बस स्थानक परिसरात रविवारी (ता.१६) एका इसमाचा मृतदेह आढळला आहे. हा इसम बेनाडी (ता. निपाणी) येथील असून भरमा कृष्णा ढवणे (वय ५५) असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद कागल पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
कागल बस स्थानक परिसरात रविवारी (ता.१६) सकाळी १० वाजता भरमा ढवण हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना उपचाराकरिता कागल येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याबाबतचा अधिक तपास सहायक फौजदार कोच्चरगी हे करीत आहेत. मयत भरमा ढवणे यांच्या मागे आई, पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta