Share
सर्व व्यवहार बंद : रस्त्यावर शुकशुकाट
कोगनोळी : अखिल भारतीय जैन समाजाने गुरुवार तारीख 20 रोजी भारत बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार कोगनोळी मधील सर्व समाजाने गुरुवारी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून भारत बंद यशस्वी करावा असे जाहीर आवाहन समस्त जैन समाज यांच्यावतीने केले होते.
कोगनोळीकरांनी जैन समाजाने पुकारलेल्या बंदला 100% प्रतिसाद दिला. गावातील सर्व व्यवहार बंद असल्याने नेहमी वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर शुकशुकाट निर्माण झाला होता.
गावातील अत्यावश्यक असणारे मेडिकल, दवाखाने, दूध संकलन केंद्रे वगळता सर्व व्यवहार बंद होते.
हिरेकुडी तालुका चिकोडी येथे परमपूज्य 108 आचार्य श्री कामकुमार नंदी महाराज यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ जैन समाजाने ठिकठिकाणी अनेक मूक मोर्चा काढून सरकारी कार्यालयात निवेदन देऊन निषेध नोंद केला आहे. जैन समाजाने गुरुवार तारीख 20 रोजी कोगनोळी येथील सर्व व्यवहार बंद ठेवावेत व निषेध पाळावा असे आवाहन केले होते. आवाहनाला 100% प्रतिसाद देऊन बंद यशस्वी केला आहे.

Post Views:
1,369
Belgaum Varta Belgaum Varta