Monday , December 8 2025
Breaking News

ममदापूर ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

Spread the love

 

अध्यक्षपदी विद्या शिंदे, उपाध्यक्षपदी गजानन कावडकर

निपाणी (वार्ता) : ममदापूर (के. एल.) ग्रामपंचायतीच्या झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या अमित शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्ष पदासाठी मतदान पद्धतीने झालेल्या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मारुती कावडकर व भाजप गटाचे बाळासाहेब कदम असे दोन अर्ज दाखल झाले. यावेळी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत दोघाही उमेदवारांना समसमान पाच मते मिळाली. समसमान मतामुळे सर्वसामान्यजसाने यावर चिट्ठी टाकून तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन कावडकर विजयी झाल्याचे निवडणूक अधिकारी सुदीप चौगुले यांनी जाहीर केले.
निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा निवडणूक अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवडीनंतर अध्यक्षा विद्या शिंदे, उपाध्यक्ष गजानन कावडकर यांनी गावच्या विकासासाठी आपण युवा नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कार्यरत राहण्याची ग्वाही देऊन निवडीनंतर बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ग्रामपंचायत सदस्य निरंजन पाटील-सरकार म्हणाले, उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या गटाकडे असणाऱ्या दोन्हीही पदे मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करून आपण सर्वांना विकासात घेऊन गावच्या विकासाला देण्याची ग्वाही दिली.
यावेळी रावसाहेब गोरवाडे, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, इम्रान मकानदार, शिरीष कमते, महादेव मधाळे, उत्तम पाटील, शेखर पाटील सुनील पाटील, संजय पाटील, मधुकर उत्तुरे, संभाजी हरेल, प्रकाश पाटील, मोहन पाटील, बाळासाहेब गोरवाडे, संदीप तोडकर, बालाजी मगदूम, राजेंद्र पाटील, रमेश शिंदे, अरुण चौगुले, पांडुरंग केनवडे, संभाजी पाटील, देवर्डे यांच्यासह राष्ट्रवादी गटाचे कार्यकर्ते, ग्राम विकास अधिकारी, सचिव विकास अधिकारी प्रकाश धनगर, सचिव राजेंद्र गवंडी उपस्थिती होते.
निवडीनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी सह गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. निवडणुकी दरम्यान सदलगा पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

About Belgaum Varta

Check Also

इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी जवळ खून

Spread the love  धारदार शस्त्राचा वापर ; मृतदेह टाकला ओढ्यात निपाणी (वार्ता) : इचलकरंजी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *