‘महात्मा बसवेश्वर’तर्फे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर
निपाणी (वार्ता) : इच्छाशक्ती असल्यास कोणत्याही क्षेत्रात यश हमखास मिळते. तर प्रत्येक समाजसेवक मात करत राहिल्यास जीवन सुखी बनते.
समूहामध्ये काम करत असताना यश हे एकट्याचे नसते तर सर्वांचे असते, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. कर्मचारी वर्गाने संस्थेच्या प्रगतीत हातभार लावणे ही त्यांची जबाबदारी आहे. ताणतणाव न घेता काम करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे मत बेळगाव येथील मार्केटिंग तज्ञ श्रीधर कोकणूर यांनी केले.
येथील महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे सर्व शाखांचे कर्मचारी संचालकांसाठी आयोजित व्यक्तिमत्व विकास शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी हे होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बसव प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन झाले. संचालक डॉ. एस. आर. पाटील यांनी स्वागत केले.
कोकणूर म्हणाले, समस्या या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. पण त्यांचा किती त्रास करुन घ्यायचा हे आपल्यावर आहे. ज्यांच्याकडे राहायला घर, अन्न, सुखी कुटुंब आणि शांत झोप आहे, त्याच्यासारखा श्रीमंत कोणीही नाही. हीच खरी श्रीमंतीची व्याख्या आहे. काल आणि उद्या हे दोन दिवस विसरून आजचा दिवस कुटुंब आणि संस्थेसाठी द्यावा. कुटुंबातील मुलांना त्यांना आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. येणाऱ्या काही दिवसात चांगले काहीतरी घडणार आहे, या सकारात्मक विचारावर प्रत्येकाने काम करण्याचे आवाहन केले.
योगेश देशमुख यांनी, सायबर विम्यासंदर्भात मार्गदर्शन करताना सायबर डाटा हॅक झाला तर विम्याच्या माध्यमातून बँकांना पैसे परत मिळवता येतात. त्यामुळे सायबर इन्शुरन्स महत्त्वाचा असल्याचे सांगितले. अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांनी, संस्थेच्या प्रगतीत कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. कर्मचारी हे एक कुटुंबाचे सदस्य म्हणून त्यांच्या स्वास्थ्यासाठी वेळोवेळी व्यक्तिमत्व विकास शिबिरे आयोजित केली जात असल्याचे सांगितले.
डॉ. कुरबेट्टी यांची संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल
विविध शाखां तर्फे सत्कार झाला.
कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश शेट्टी, संचालक प्रताप पट्टणशेट्टी, श्रीकांत परमणे, महेश बागेवाड़ी, सदानंद दुमाले, प्रताप मेत्राणी, अशोक लिगाडे, पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, सदाशीव धनगर, दिनेश पाटील, मुख्य शाखा व्यवस्थापक शशिकांत आदन्नावर व कर्मचारी उपस्थित होते. सुजाता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सुरज घोडके यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta