बेळगाव : मोबाईल चार्ज करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेचा धक्का लागल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे घडली.
27 वर्षीय आकाश शिवदास संकपाळ असे मृत तरुणाचे नाव आहे. श्रीपेवाडी, निपाणी औद्योगिक परिसरात राहणारे आकाश हा घरी मोबाईल चार्ज करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना अचानक विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत मृत तरुणाच्या वडिलांनी माहिती दिली असून निपाणी पोलिस ठाण्यात कलम १७४ सीआरपीसी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta