राजेंद्र वडर; मंत्री शिवराज तंगडगी यांची घेतली भेट
निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारच्या वतीने तयार करण्यात आलेल्या भोवी वडर अभिवृद्धी निगममध्ये आतापर्यंत उत्तर कर्नाटकला आणि बेळगांव जिल्ह्याला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे या भागातील वडर भोवी समाजाचा विकास झालेला नाही. त्यासाठी आता भोवी अभिवृद्धी निगममध्ये बेळगांव जिल्ह्याला स्थान द्यावे, अशी मागणी मागासवर्गीय विकास व सांस्कृतिक विभाग सचिव शिवराज तंगडगी यांच्याकडे भोज जिल्हा पंचायत माजी सदस्य व कर्नाटक राज्य वडर समाजाचे उपाध्यक्ष राजेंद्र वडर पवार यांनी केले. ते बेंगलोर येथे त्यांनी भेट घेऊन याबाबत चर्चा केले.
शिवराज तंगडगी हे भोवी वडर समाजाचे मंत्री आहेत. शिवाय कर्नाटकात काँग्रेस सरकार सत्तेवर आहे. असे असताना समाजातील अत्यंत गरीब आणि कष्टकरी समाज म्हणून वडर समाजाकडे पाहिले जाते. अत्यंत कठीण कामे हे वडर समाजाकडून करण्यात येत असतात. त्यासाठी या समाजाचा विकास होणे गरजेचे आहे. वडर समाज अद्याप जास्त सुशिक्षित झालेला नाही.परिस्थिती गरीब असल्याने शिक्षणाकडे जास्त लक्ष देता नाही. त्यासाठी भोवी अभिवृद्धी निगम मधून समाजाचा खऱ्या अर्थाने विकास झाला पाहिजे. यासाठी उत्तर कर्नाटक आणि जास्त करून बेळगांव जिल्ह्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी या भागाला अभिवृद्धी निगममध्ये स्थान मिळावे. बेळगाव जिल्हा सीमावर्ती जिल्हा असून लागूनच असलेल्या महाराष्ट्रात वडर समाजाला प्रति महिना प्रत्येक कुटुंबाला 200 ब्रॉस दगड फोडण्याला पूर्ण मोफत करण्यात आलेले आहे. आणि त्यानंतरच्या प्रत्येक ब्रॉसला कर आकारला जातो. पण कर्नाटक सरकारकडून कोणत्याच प्रकारे सवलत दगड फोडणाऱ्यांना मिळत नाही. त्यासाठी महाराष्टच्या धर्तीवर कर्नाटकातही कर मुक्त करावे अशी मागणी करत याबाबत संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांना याबाबत माहिती पुरवावे असे सांगितले.
मंत्री शिवराज तंगडगी यांनी याबाबत वरिष्ट नेत्यांशी चर्चा करून उत्तर कर्नाटकातील भोवी वडर समाजाचा विकासासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. शिवाय अभिवृद्धी निगम मध्ये बेळगांव जिल्हाला स्थान देण्याचे आश्वासन दिले. अशी माहिती राजेंद्र वडर पवार यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta