राजेंद्र वडर; अधिकाऱ्यांनी ताबडतोब लक्ष देण्याची मागणी
निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षांपूर्वी आमदारांच्या प्रयत्नातून बाळोबा क्रॉस व भोज गळतगा क्रॉस सुशोभीकरण करण्यासाठी प्रत्येकी सुमारे एक एक कोठी रुपये मंजूर करण्यात आले होते. बाळोबा क्रॉसचे सुशोभीकरण चांगले, दर्जेदार आणि लवकर करण्यात आले. पण भोज गळतगा क्रॉस वरील रुंदीकरण आणि सुशोभीकरणाला दोन वर्षे लावले. शिवाय कामही निकृष्ठ तर झालेच आहे. पण अद्याप काम अर्धवट आहे. विद्युतीकरण आणि दुभाजक होणे बाकी असताना काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी सदर कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे आरोप भोज माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर यांनी केले आहे.
राजेंद्र वडर म्हणाले, एक एक कोटी रुपयांतून बाळोबा क्रॉस आणि गळतगा भोज क्रॉस सुशोभीकरण करण्यात आले आहे. बाळोबा क्रॉसचे सुशोभीकरण ताबडतोब आणि चांगल्या प्रकारे करण्यात आले. क्रॉसला जोडणाऱ्या रस्त्यांची दर्जेदार बांधणी, विधुत खांब व दुभाजक असे काम उद्घाटनच्या एक वर्षाच्या आत करण्यात आले. पण भोज क्रॉस सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करून दीड दोन वर्षानी प्रत्येक्षात कामाला सुरुवात करण्यात आले. याठिकाणी ज्या पद्धतीने काम होणे गरजेचे होते. त्या पद्धतीने रस्ता रुंदीकरण करण्यात आले नाही. या ठिकाणी पाच रस्ते जुळतात. पण एकाच रस्त्याला फलक लावण्यात आले आहे. याठिकाणी विधुत खांब बसविण्यात आलेले नाहीत अथवा दुभाजक तयार करण्यात आले नाही. सदर सर्व कामे शिल्लक असताना ठेकेदार बसवराज मटगार यांनी काम संपल्याचे सांगून अर्धवट काम सोडून गेले आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे बी. बी. बेडकीहाळे यांच्याशी संपर्क साधले असता तेही काम पूर्ण झाल्याचे सांगून सुशोभीकरण निधीतील सुमारे दहा लाख रुपये शिल्लक असल्याचे सांगितले. पण सुढोभाकरनाच्या नावाखाली निधी मंजूर केले असतील तर सुशोभीकरण अर्धवट स्थितीत का ठेवले. आणि एक कोठी रुपयांतून फक्त दहा लाख रुपयेच शिल्लक कसे राहिले. ठेकेदार रस्त्याला दुभाजक आणि फलक न लावता आपल्या मंजूर निधीतून दहा लाख रुपये का शिल्लक ठेवले असे प्रश्न. उपस्थित करून आमदारांनी याकडे ताबडतोब लक्ष द्यावे. शिवाय जो पर्यंत भो क्रॉसचे सुशोभीकरण करण्यात येत नाही. तोपर्यंत सदर रस्ता हस्तातर करून घेऊ नये. जर या गोष्टीकडे संबधितानी ताबडतोब लक्ष दिले नाही. आणि भोज क्रॉसचे उर्वरित कामे झाले नाहीत तर वरिष्ठ अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांना याबाबत कळवून मोठे आंदोलन करण्यात येईल असे माहिती राजेंद्र वडर पवार यांनी दिले. त्यामुळे या रस्त्यासाठी पुढे काय होणार रस्ता काम पूर्ण करणार की आंदोलन याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta