निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल) येथील देवचंद महाविद्यालयात श्रावण महिन्यानिमित्त पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये अकरावी शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला. प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे यांच्या हस्ते पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य ए. डी. पवार, एस. पी. जाधव तर निमंत्रक म्हणून प्रा. डॉ. भारत पाटील हे होते.
संत तुकाराम, गणपती, ओम, इंडीयन आर्मी, फुलपांखरू, मोर, विविध प्रकारचे बुके, पॉट डीझाईन कलाकृती विद्यार्थीनींनी साकारल्या होत्या. त्यामध्ये बागेतील, फुले, रान फुले, शेतातील फुलांचा उपयोग करण्यात आला होता. चाफा, मोगरा, अबोली, झेंडू, जरबेरा, गुलाब, जास्वंद, कर्दळ, पारीजात, सदाफुली, पांढरा व जांभळा गोकर्ण इत्यादी फुलांनी सजावट करण्यात आली होती. परीक्षक म्हणून डॉ. वर्षा खुडे, डॉ. स्मीता पाटील यांनी काम पाहीले. कार्यक्रमास जीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अशोक डोनर, प्रा. सागर माने, प्रा. एम. पी. रानभरे, प्रा. एम. आर. शेंडगे, प्रा. ए. एम. खोत, संजय सुतार यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थीती होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ.तृप्तीभाभी शाह, डॉ. प्रतीभाभाभी शाह यांचे प्रोत्साहन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta