निपाणी (वार्ता) : निपाणी येथील व्ही.एस.एम. शिक्षण संस्थेच्या जी. आय. बागेवाडी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सीआरसी पातळीवरील क्रीडा स्पर्धेमध्ये यश मिळवून त्यांची तालुका पातळीवर क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
२०० मीटर धावण्यामध्ये अरुण भोंगाळे, ६०० मीटर धावण्यात अमर महेश गुरव, १०० मीटर धावण्यात गौरव अमर माळवे यांनी यश मिळवले. थाळी फेकमध्ये श्रावणी एस. हिरेमठ, कबड्डी मध्ये मुलींचा संघ, खो-खो मध्ये मुलांचा मुले संघ, खो-खो मुलींचा संघ, योगा मध्ये मुलांचा संघ द्वितीय
गोळा फेकमध्ये अरुण भोंगाळे, लांब उडी मध्ये श्वेता अप्पा हेरवाडे यश मिळवले. वरील सर्व खेळाडूंची तालुका स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन चंद्रकांत कोठीवाले मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी कौतुक केले.
Belgaum Varta Belgaum Varta