निपाणी (वार्ता) : शहरातील विविध भागातील युवक आणि युवती भारतीय सेनेत भरती झाले आहेत. त्यानिमित्त त्यांचा येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिर कमिटीतर्फे माजी सभापती सुनील पाटील व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जत्राट वेसमधील नंदिनी सोनावणे, मुगळे गल्लीतील ऋषिकेश मेंडगुदले, कुंभार गल्लीतील प्रथमेश पाटील, आमचे गल्लीतील सुरज मलाबादे, प्रथमेश मलाबादे, बागवान गल्लीतील आकाश सुतार यांचा सत्कार झाला. कार्यक्रमास महादेव पाटील, सदानंद चंद्रकुडे, इराण्णा शिरगावे, शिवकांत चंद्रकुडे, रोहित पाटील, कल्लाप्पा खोत, अभियंते राजू पाटील, रवींद्र चंद्रकुडे यांच्यासह महादेव मंदिर कमिटीचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. बाबासाहेब साजन्नावर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta