निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ येथील सन्मती विद्या मंदिरमध्ये आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा घेण्यात आला. त्यामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक अध्यक्षस्थानी होते तर शिक्षण प्रेमी महावीर कलाजे तर प्रमुख पाहुणे म्हणून शितल पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर पालक प्रतिनिधी वसंत नलवडे व छाया आरगे यांची उपस्थिती होती.
एस. बी. बेळगुदरी यांनी स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार झाला.
मुख्याध्यापक एम. बी. कोल्हापुरे यांनी, दहावीची बोर्ड परीक्षा, बदललेली पद्धत, आठवी, नववी दहावी विद्यार्थ्यांची प्रगती, त्यांची काळजी, अभ्यास याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. केले.
शीतल पाटील यांनी, सन्मती विद्यामंदिरचे कौतुक केले. येथील सर्व होतकरू शिक्षक आतापर्यंत उच्च पदावर गेलेले विद्यार्थी असा सर्वांचा उल्लेख करत खेड्यामधील मिळणारे शिक्षण महत्त्वाचे आहे. मातृभाषेतील शिक्षण आत्मसात होत असल्याचे सांगून पालकांशी थेट चर्चा साधून विद्यार्थ्यांना व पालकांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमासाठी ए. बी. नेजे, पी. एम. तोटद, शितल मगदूम, दादा मगदूम व अनेक पालक उपस्थित होते.
या सर्व कार्यासाठी संस्थेचे चेअरमन श्री. प्रकाश पाटील व सर्व संचालक मंडळाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. एस. एन. रायनाडे यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. बी. पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta