निपाणी (वार्ता) : शिक्षक दिनानिमित्त बंगळूर मधील कर्नाटक राज्य माध्यमिक सहशिक्षक संघ संघाच्या निपाणी तालुका विभागातर्फे निपाणी तालुक्यातील तीन शिक्षकांना सर्वोत्तम आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी (ता.५) येथे आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
चांद शिरदवाड येथील सरकारी हायस्कूल मधील शिक्षक
सी. व्ही. खामकर, बेनाडी येथील श्री सिद्धेश्वर हायस्कूल मधील एल. बी. बिरादार- पाटील आणि यमगर्णी सरकारी हायस्कूल मधील मधील शिक्षिका ए. बी. मुजावर यांच्या शैक्षणिक कार्याची दखल प्रशस्तीपत्र देऊन आदर्श शिक्षक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असल्याचे संघटनेचे जिल्हा कार्यदर्शी ए. ए. पिरजादे, तालुकाध्यक्ष तेजस्वीन बेळगली, प्रधान कार्यदर्शी एन. बी. कुंभार व राज्य परिषद सदस्य रावसाहेब जनवाडे यांनी सांगितले.