स्वच्छ ठेवण्याचे आवाहन
कोगनोळी : येथील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या अंबाबाई मंदिरालगत तलावातील मासे मृत होऊ लागले होते. याची दखल घेऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून तलावाची स्वच्छता करून घेण्यात येत आहे.
ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील म्हणाले, अंबिका तलाव हे गावाचे वैभव आहे. महिलांनी कपडे धुत असताना केमिकल युक्त कपडे व इतर साहित्य धुवू नये, त्याचबरोबर तलावाची स्वच्छता यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तलावात केमिकल युक्त कपडे व अन्य साहित्य धुतल्यास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सध्या तलावातील मासे मूर्त पावत असून सदर पाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीकडून रासायनिक खताचे, गुळाचे बारदान व अन्य साहित्य धुतल्याने मासे मृत पावत असून तलावाची स्वच्छता व इतर कामे पंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.
यावेळी संजय खोत, कृष्णात भोजे, मलगोंडा वडर, अनिल पाटील, शिवलिंग दिवटे, टायगर डोंगळे, काकासाहेब पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta