निपाणी जिल्हास्तरीय इंग्रजी शिक्षक कार्यशाळा
निपाणी (वार्ता) : मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह शिक्षण मंत्र्यांकडे आपण शिक्षकांच्या व शैक्षणिक क्षेत्रातील समस्या निकालात काढण्यासाठी पाठपुरावा केला असून १६ समस्या निकालात निघणार आहेत. शिक्षक प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेचे आपल्याला नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. निवडणुकीच्या दरम्यान दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. शिक्षक आणि शैक्षणिक क्षेत्रातील समस्या सोडवल्यानंतरच आपल्या नेतृत्वाचे सार्थक होणार आहे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य प्रकाश हुकेरी यांनी केले.
शिक्षण विभागाच्या उपनिर्देशक कार्यालय चिकोडी गटशिक्षणाधिकारी कार्यालय निपाणी यांच्यासह कर्नाटक राज्य प्रौढ शाळांसह शिक्षक संघ बेंगळूर शैक्षणिक जिल्हा चिकोडी आणि तालुका विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय इंग्रजी विषय शिक्षकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार प्रकाश हुक्केरी म्हणाले, शैक्षणिक विकासासाठी मंजुरी देत असताना अर्थ विभागाकडून देखील मंजुरी मिळणे आवश्यक असते. यासाठी देखील पाठपुरावा केला जात आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपण प्रामाणिक सेवा देत आहोत. लोकसभा सदस्य असताना केंद्रीय विद्यालयांना मंजुरी मिळवली. चिकोडी बेळगाव, विजापूर, बागलकोट शैक्षणिक जिल्ह्यात लॅपटॉप वितरण करण्याची योजना राबवली आहे. शिक्षकांबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील मूलभूत विकास गतीने केला जाणार आहे असे सांगितले. यावेळी अप्पर आयुक्त कचेरी धारवाडचे सहसंचालक गजानन मन्नीकेरी यांनीही मनोगत व्यक्त केले
एस. एम. पूजार, टी. बी. वडची यांनी इंग्रजी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी चिकोडीचे डीडीपीआय मोहन हंचाटे, डायटचे प्राचार्य मोहन जिरगीहाळ, प्रौढ शाळा शिक्षक संघाचे राज्य प्रधान कार्यदर्शी रामू गुरुवाड, तुकाराम बागेरणावर, ए. सी. गंगाधर, व्ही. एस. कांबळे गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक, एम. बी. शिंदे, संघाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र निलजगी कार्यदर्शी आजमअली पिरजादे, तालुकाध्यक्ष तेजस्वीन बेळगली, कार्यदर्शी नामदेव कुंभार यांच्यासह संघाचे सदस्य शिक्षक उपस्थित होते. रावसाहेब जनवाडे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta