निपाणी (वार्ता) : येथील नगरसेविका गीता सुनील पाटील यांची श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाले आहे. त्यानिमित्त निलांबिका महिला मंडळ आणि जपान मंडळातर्फे श्रावण सोमवारचे औचित्य साधून बसव मल्लिकार्जुन स्वामींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बसव मल्लिकार्जुन स्वामीजी यांनी, अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात सुनील पाटील व गीता पाटील या दांपत्याचे योगदान मोठे आहे. त्यांच्या या कार्याची पोचपावती म्हणून त्यांची राजकीय वाटचालही प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. सत्काराबद्दल पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त करून साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित साधण्याची ग्वाही दिली. यावेळी माजी सभापती सुनील पाटील, सुलोचना पाटील, प्रतिमा पाटील, वर्षा भोपळे, उमा शिरगावे, जयश्री अक्की, लक्ष्मी चंद्रकुडे, माधुरी चंद्रकुडे, सदानंद चंद्रकुडे, शिवकांत चंद्रकुडे, रवींद्र चंद्रकुडे, विजय चंद्रकुडे, कल्लाप्पा खोत, रोहित पाटील,बाळू बाळीकनावर, शिवानंद वसेदार, किरण भालेबालदार, बंडू जलपुरे, उमेश पाटील, इराण्णा शिरगावे, बाळकृष्ण वसेदार, बाबासाहेब साजनावर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta