प्रादेशिक आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
निपाणी (वार्ता) : येथील तहसील कार्यालयाच्या भूमी विभागात लाच घेताना लोकायुक्त कारवाई करण्यात आली होती. यामध्ये भूमी विभागाचे अधिकारी उपतहसीलदार अभिषेक बोंगाळे व संगणक चालक पारिस सती यांना जेरबंद करण्याची कारवाई झाली होती. या माध्यमातून उपतहसीलदार अभिषेक बोंगाळे यांना प्रादेशीक आयुक्तांनी तर संगणक चालक पारिस सती यांना जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबन केल्याचे आदेश बजावले आहेत.
तहसीलदार कार्यालयाच्या भूमी विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. पण तक्रारीसाठी कोणीही पुढे येत नसल्याने कारवाई होत नव्हती. अशा या परिस्थितीत होणारा भ्रष्टाचार रोखण्याच्या उद्देशाने ऍड. राजकुमार शिंदे-गळतगा यांनी आपले अशील रत्नवा गुग्गे यांच्याकडे पाच हजाराची लाच मागितली जात असल्याची तक्रार १८ जुलै रोजी केली होती.
शेती उतारा कामासाठी मागीतल्या गेलेल्या पैशाचे गांभीर्य लक्षात घेऊन लागलीच १९ जुलै रोजी लोकायुक्त कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत अभिषेक बोंगाळे व पारिस सती यांना रंगेहात पकडले होते. या कारवाईतून दोन्ही अधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी दिली होती. प्रादेशीक आयुक्तांनी ७ सप्टेंबर रोजी अभिषेक बोंगाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करताना रायबाग येथे बदलीचे आदेश दिले आहेत. पारिस सती यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबनाची तालुक्यातील मलिकवाड येथे बदलीचे आदेश दिले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta