निपाणी (वार्ता) : बंगळुर येथील फ्रीडम पार्क मध्ये कर्नाटक राज्य रयत संघटनेची बैठक रविवारी (ता.१७) पार पडली. त्यामध्ये येथील राजू पोवार यांची कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी चिकोडी जिल्हा अध्यक्ष म्हणून शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवल्या होत्या. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्य कार्यकारणी संघटनेने ही निवड केली आहे. निवडीनंतर त्यांचा संघटनेतर्फे सत्कार झाला.
निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून, आता आपल्यावरील जबाबदारी वाढली असेल राज्यातील सर्वात शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे राजू पोवार यांनी सांगितले.
यावेळी रयत संघटनेचे राज्य अध्यक्ष चुनाप्पा पुजारी, उपाध्यक्ष सुरेश पिरगन्नावर, महेश गौडा, डॉ. हणीत, संगमेश सागर, शरणाप्पा मुरली, गुलाबगौडा पाटील, व्यंकटेश नाईक. शरद हळली यांच्यासह राज्य समिती सदस्य, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta